त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने या परिसरांमध्ये नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. याच बरोबर नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी फलक लावून नागरिकांनी कचरा घाण टाकण्यास मनाई करण्याची गरज आहे, अशी मागणी भाजपचे जिल्हा शैलेंद्र आजगे, विनोद पगारिया, तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, श्रीकांत कार्ले, महेंद्र देसले, आदिवासी आधाडीचे हेमंत पवार, व्यायाम शाळेचे सदस्य आदींनी केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने याविषयी त्वरित कारवाई करावी. जर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर जय वीर हनुमान व्यायाम शाळेतील सदस्य आंदोलनात्मक पवित्रा घेतील. याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आलेला आहे.
200921\img-20210908-wa0045.jpg
साक्री येथील वीर हनुमान व्यायाम शाळा व शेजारील सर्व मंदिर परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण.