वरुणराजाच्या प्रार्थनेसाठी लोटले अवघे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:25 IST2019-07-28T22:25:12+5:302019-07-28T22:25:59+5:30

वरुणराजाच्या प्रार्थनेसाठी लोटले अवघे गाव

Varuna village for praying Varun Raja | वरुणराजाच्या प्रार्थनेसाठी लोटले अवघे गाव

कोडीद येथे पावसासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डोक्यावर हंडे घेऊन पाणी मागतांना मुली.

शिरपूर : तालुक्यातील कोडीद गावातील शेतकरी व संपूर्ण गावातील नागरिकांनी वरुणराजा बरसावा यासाठी गावातून मिरवणूक काढली. डोक्यावर हंडा घेत गावात पाणी मागून कोडीद गाव बंद पुकारण्यात आले़ दरम्यान, पावसाच्या सरी आल्याने कोडीद गावातील मुख्य चौकातच गीतगायन व गरबा करुन नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
गावात पाऊस पडत नसल्यामुळे २६ रोजी गाव बंद पुकारुन दुखवटा पाळण्यात आला. संपूर्ण गावातील लोकांनी एकतेचा संदेश देत वरुणराजाला प्रार्थना करण्यासाठी आदिवासी संस्कृतीनुरूप गावातून पाणी मागून मिरवणूक काढली. यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले होते. सर्वांसाठी प्रसाद करण्यात आला़ यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  
मिरवणूक कोडीद गावातील भवानी शंकर मंदिरापासून सुरु होऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली़ 
समारोप गावातील भगवान शंकराच्या पिंडीवर कळशीभर पाणी टाकून करण्यात आला़ शेवटी प्रसाद वाटून समारोप करण्यात आला़ यानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे गावकºयांच्या आनंदाला उधाण आले. नागरिकांनी गावाच्या चौकात आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पोलिस पाटील भरत पावरा, डॉ़हिरा पावरा, सरपंच सोनिया भरत पावरा, माजी जि.प. सदस्य दिलीप गंगाराम पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, विलास पाटील, शमाताई पावरा, पूनम पावरा, संतोष पावरा, संभु पावरा, शब्बीर पावरा, कनवर पावरा, रणजीत पावरा, गोपी पावरा, मगन पावरा, रतन पावरा, कांतीलाल पावरा, सागर पावरा, पप्पू पावरा, भरत पावरा, सुनील पावरा, सदाशिव बागुल, इंद्रसिंग पावरा  व गावातील युवक, युवती, महिला उपस्थित होते़

Web Title: Varuna village for praying Varun Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे