शिरपुरात १५ ऑगस्ट दिनी विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:42+5:302021-08-17T04:41:42+5:30
शिरपूर : शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आलेत़ शासकीय ध्वजारोहण ...

शिरपुरात १५ ऑगस्ट दिनी विविध कार्यक्रम
शिरपूर : शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आलेत़
शासकीय ध्वजारोहण
शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी तहसीलदार आबा महाजन, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते़
पटेल संकुलात ध्वजारोहण
शिरपूर येथील आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलात माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, फिरोज काझी, श्रेणीक जैन, प्रीतेश पटेल, वित्तीय अधिकारी नाटूसिंग गिरासे, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्या शारदा शितोळे, प्राचार्य पी.व्ही. पाटील, प्राचार्य आर.बी. पाटील, मुख्याध्यापक सी.डी. पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कर्मवीर रणधीर सीबीएसईला ध्वजारोहण
शहरातील के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई. स्कूल येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण निवृत्त आर्मी हवालदार गजानन भावसार यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, कार्याध्यक्षा आशाताई रंधे, विश्वस्त सीमा रंधे, निवृत्त आर्मी हवालदार गजानन भावसार, प्रवीण ढोले, मनोज मांगले व प्रदीप राजपूत, समन्वयक अमोल सावळे, सागर वाघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते़ शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य व वेशभूषेतून भारताच्या विविधतेतून एकता या सूत्राचे दर्शन घडवून आणले. तसेच कोरोना नियमांचे पालन करत इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कविता सैंदाणे, मंगला निकम व नुरजहान शेख यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन कविता सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी के.व्ही.टी.आर. स्पोर्ट्स क्लब व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
वरूळ येथे स्वातंत्र्य दिन
तालुक्यातील वरूळ येथील एच.आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य एस.एन. जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन एस.सी. शिंपी यांनी केले. याप्रसंगी पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सिपल मराठे, एम.व्ही. पाटील, डी.एन. माळी, बी.एन. पाटील, एस.एच़. निकुंभे, एम.बी. पाटील, पी.आर. मोरे, एस.एस. पाटील, एन.एस. म्हस्के, आर.एम. मोरे, एस.एम. झटकर, वाय़.डी. पाटील, पी.टी. पवार उपस्थित होते.
डॉ. विजयराव रंधे स्कूल
शिरपूर येथील डॉ. विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक प्रा.जी.व्ही. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच भारतातील दिवस-रात्र सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, शिक्षक, सफाई कामगार, या क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थी-पालक कीर्ती मीठभाकरे, मुकेश पावरा, कल्पना पाटील, डॉ. अमोल निकुमे, बंटी सारसर यांचा शाळेच्या संचालिका हर्षाली रंधे यांच्या हस्ते शाल, गौरवपत्र व श्यामची आई पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी प्रमोद पाटील, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी वंदना पांडे, ज्योती देशमुख, विशाल सोनगडे, वंदना पाटकरी, शीतल चव्हाण, रिद्वाना शेख, सुरेखा चौधरी, समाधान राजपूत यांनी परिश्रम घेतले. विश्वकर्मा यांनी ध्वजगीत सादर केले. सूत्रसंचालन मनीषा लोखंडे तर आभार प्रदर्शन उमेश राजपूत यांनी केले.
रोहिणी येथे ध्वजारोहण
रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आर.पी. अढावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ जि.प. सदस्य कैलास पावरा व पं.स. सदस्य बागल्या पावरा यांच्या हस्ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण केले. या वेळी सरपंच डॉ. आनंदराव पावरा, भालचंद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बन्सिलाल बंजारा, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष पिंटू बंजारा, पोलीस पाटील सुभाष पावरा, ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी पवार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, पालकवर्ग उपस्थित होते. स्काऊट व गाइडचे ध्वजारोहण ज्येष्ठ स्काऊट मास्टर पी.पी. कोळी यांनी केले़ याप्रसंगी इयत्ता १० वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनी भारती बंजारा, निकिता पवार, बबिता पावरा यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन व्ही.एस. बागुल यांनी केले.
आदि जनता संस्थेत ध्वजारोहण
येथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय व शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक आय.पी. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत स्काऊट गाइड या ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजनेता वैभव संजय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एफ.ए. खाटीक यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक शाळेने ऑनलाइन पद्धतीने चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. सूत्रसंचालन आर.पी. जाधव व डी.ए. पाटील यांनी केले.
खंबाळे येथे ध्वजारोहण
खंबाळे येथील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाचे ध्वजारोहण प्राचार्य आर.एन. पवार यांनी केले. या वेळी सरपंच सुभाष गुजारिया पावरा, उपसरपंच सुशीलाबाई सुकदेव कोळी, पोलीस पाटील सुनील शिलदार पावरा, पद्मसिंग मदनसिंग परदेशी, सुभाष मुरलीधर कोळी, ग्रामसेवक आनंदा आसाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुकदेव एकनाथ कोळी, सुनील गिरधार पावरा, हिरालाल रघुनाथ कोळी, डॉ. सतीश गंगाराम पावरा उपस्थित होते. सूत्रसंचालन सी.एन. पाटील, प्रास्ताविक डी.ए. पावरा तर आभार आर.एल. तवर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी व्ही.एस. बेलदार, व्ही.एन. दोरिक, एम.झेड. पाटील, आर.यू. पवार, एम.आय. मुसलमान, एस.डी. पाटील, पी.बी. वाघ, ए.बी. महाजन, एम.जी. अहिरे, जाधव, एम.के. पावरा, राजू बंजारा उपस्थित होते.
बभळाज येथे स्वातंत्र्य दिन साजरा
बभळाज येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एस ए. कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी सरपंच जगन्नाथ महाजन, उपसरपंच धाकू भील, पंचायत समिती सदस्य दर्यावसिंग जाधव, अजमल जाधव, लक्ष्मण पाटील, रवींद्र जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.यू. चौधरी व आर.पी. जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पी.एस. पाटील, आर.ए. माळी, के.एल. पाटील, जान्हवी पाटील, एस.एस. वानखेडे, आर.टी. पाटील, आर.व्ही. नामगे, आनंद बेलगमवार यांनी सहकार्य केले़
सावळदे येथे स्वातंत्र्य दिन
सावळदे येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका एन.पी. देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन एम.एल. जाधव यांनी केले. याप्रसंगी व्ही.बी. गाढवे, एस.आर. बोरसे, एम.एल. जाधव, जी.डी. शिवदे, ए.बी. निळे, एस.एल. भील, पी.आर. माळी, एस.आर. जावरे, एस.एफ. शिरसाठ, बी.पी. रोकडे उपस्थित होते़
दहिवद येथे स्वातंत्र्य दिन
दहिवद येथील स्मिता पाटील सीबीएसई निवासी पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे ट्रस्टी ज्ञानेश्वर पितांबर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी प्रशासकीय अधिकारी ब्रिगेडियर संजय सांगवान, प्राचार्या चंद्रकला तिवारी आदी उपस्थित होते़
इंटरनॅशनल स्कूलला ध्वजारोहण
दहिवद येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रोग्रेसिव्ह रूरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी १० वी परीक्षेत टॉपर ठरलेल्या नंदिनी पाटील, साक्षी करंदीकर, राज शिंपी यांचा सत्कार करण्यात आला़ या वेळी चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, प्राचार्य प्रकाश एम.व्यास, उपप्राचार्य कुऱ्हेकर आदी उपस्थित होते़ इयत्ता १० वीचा विद्यार्थी तनिष्क खैरनार याने देशभक्तीपर गीतावर सुमधुर बासरीवादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन दिनेश दुसाने यांनी केले. इयत्ता ८ वीचे विद्यार्थी निवृत्ती राजपूत, यश शिंपी, स्नेहा सोनवणे, ईषिता काटे या विद्यार्थ्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या थोर स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण केली.
पंचायत समितीत ध्वजारोहण
येथील पंचायत समितीत उपसभापती धनश्री योगेश बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी साहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता अमर पाटील, गटशिक्षणाधिकारी एस़ सी़ पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेश बागुल आदी उपस्थित होते़
निमझरी येथे ध्वजारोहण
निमझरी येथील आर.सी. पटेल अनुदानित आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे शिक्षण विस्तार अधिकारी सनेर, सरपंच रूपाबाई मन्साराम भिल, उपसरपंच राजेंद्र गुजर, ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई गव्हाणे, मुख्याध्यापक पी.डी. पावरा, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. पाटील, नितीन पाटील, ग्रामसेवक गावित, अभिमन गुजर, मन्साराम भिल उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक पी.एन. लोहार यांनी केले. देशभक्तीपर गीत एस.ए. गोपाळ व पी.आय़. बडगुजर यांनी सादर केले. शाळेच्या प्रांगणात बेल, आवळा, शिसम, कडुनिंब आदी रोपे लावण्यात आली. सूत्रसंचालन ए.पी. माळी तर आभार प्रदर्शन के.व्ही. पाटील यांनी केले.
कोडीद येथे ध्वजारोहण
कोडीद येथील दि.न. पाडवी विद्यालयात पं.स़ सदस्या सुशीलाबाई कांतीलाल पावरा यांच्या हस्ते ध्वजारोेहण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक टी.टी. बडगुजर, सरपंच सोनी पावरा, पोलीस पाटील भरत पावरा, माजी जि.प़ सदस्य प्रकाश पावरा, गौतम सोनवणे, कांतीलाल पावरा, ग्रामसेवक सूर्यवंशी, तलाठी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना योद्धा डॉक्टर, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्तींचा सन्मान करण्यात आला़ सूत्रसंचालन जे.झेड. पावरा व एस.के. खैरे यांनी केले़
टेकवाडे येथे विविध स्पर्धा
टेकवाडे येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात प्राचार्य के.आर. जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पर्यवेक्षक के.एस. मराठे, जी.पी. पटेल, जे.व्ही. पाटील, एस.एम. पाटील, ए.एस. पाडवी, डी.बी. तडवी उपस्थित होते़ सूत्रसंचालन आर.एच. भलकार यांनी केले.
क्रांतीनगर येथे स्वातंत्र्य दिन
शिरपूर शहरातील क्रांतीनगरातील आर.सी़ पटेल मराठी प्राथमिक शाळेत माजी नगरसेवक गोकुळसिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़ मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे यांनी थोर महान देशभक्तांविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रीकांत पंडित, सुधाकर जाधव, मीनल माळी, भावना शुक्ल, स्मिता साळुंखे, मंदाकिनी देशमुख, कामिनी देवरे, शिल्पा पाटील, मनोज भोई, रवींद्र पावरा, दीपक गोपाळ यांनी सहकार्य केले़
रामसिंगनगर येथे स्वातंत्र्य दिन
शहरातील रामसिंगनगरातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी नलिनी राठी, नेहा अग्रवाल, दीप्ती मराठे, कविता बाविस्कर, मुख्याध्यापक आर.टी. भोई, जे.के. सोलंकी, व्ही.के. सोनवणे, पी.एस. ईशी, पी.ए. सोनवणे, एच.एम. मोरे, आर.आर. चौधरी, एस.एस. पावरा, एन.आय़. राजपूत उपस्थित होते. सूत्रसंचालन मोरे तर आभार महाजन यांनी मानले़
सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्य दिन
शिरपूर येथील श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७५ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दौलत परशुराम धमानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद वैद्य होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप लोहार, विश्वस्त प्रभाकर शिंपी, राजेंद्र किसनसिंह राजपूत, राधेश्याम बनवारीलाल गुप्ता, विजयसिंह पाटील, दिलीप चौधरी, साहेबराव बडगुजर, बाबूलाल धमाणी, प्रकाश धमाणी, अनिल धमाणी, शशिकांत चौधरी, व्यवस्थापक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
वरवाडे येथे ध्वजारोहण
शहरातील वरवाडे भागातील आर.सी. पटेल शाळेत सामाजिक कार्यकर्ता विठ्ठल बोटकू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ या वेळी अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, अखिल भारतीय समता परिषद तालुका अध्यक्ष रवींद्र भिकन माळी, डॉ. वीरेंद्र देसले, मुख्याध्यापक एम.बी. परदेशी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले़
फोटो- मेलवर