जैताणे येथे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:31+5:302021-08-17T04:41:31+5:30

जैताने ग्रामपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सहभागाचे मानपत्र व ग्रामपालिकेला मिळालेले आयएसओ मानांकनचे सन्मानपत्र रघुवीर खारकर यांच्याहस्ते सरपंच कविता मुजगे ...

Various events at Jaitane | जैताणे येथे विविध कार्यक्रम

जैताणे येथे विविध कार्यक्रम

जैताने ग्रामपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सहभागाचे मानपत्र व ग्रामपालिकेला मिळालेले आयएसओ मानांकनचे सन्मानपत्र रघुवीर खारकर यांच्याहस्ते सरपंच कविता मुजगे व उपसरपंच कविता शेवाळे यांना प्रदान करण्यात आले.

गावातील माजी सैनिकांचा तसेच दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी गावातील डॉक्टर असोसिएशनचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दिव्यांगांना दिव्यांग युनिक कार्डचे वाटप आज पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक मुजगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच कविता राकेश शेवाळे, गटनेते बाजीराव पगारे, रमनबाई चौधरी, सायंकाबाई सोनवणे, राजेश बागूल, गोकुळ पगारे, गणेश न्याहळदे, सत्तार मणियार, अनिता जाधव, संगीता मोरे, अश्विनी बोरसे, तनुजा जाधव, पोपट आण्णा चौधरी, लहूजी बोरसे, शांताराम मोरे, गोकुळ पाटील, नंदकुमार जाधव, हिम्मत मोरे, समाधान महाले, एकनाथ सोनवणे, मा. उपसरपंच नानाभाऊ यादव पगारे, भगवान भलकारे, चैत्राम बोरसे, ईश्वर बापू पेंढारे, दौलत जाधव, ज्येष्ठ नागरिक बारकू दादा शिरोळे, प्रकाश पाटील, शेख शकील शेख इस्माईल, मल्हारी जाधव, प्रा. रवींद्र सूर्यवनशी, शानाभाऊ भदाणे, संजय बच्छाव, मंडल अधिकारी बावा, तलाठी भूषण रोजेकर, अनिल सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, यादव भदाणे, योगेश बोरसे, प्रदीप भदाणे, अनिल बागूल आदी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160821\img-20210815-wa0052.jpg

जैताणे ग्रामचंयत पदाधिकारी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शपथ घेताना

Web Title: Various events at Jaitane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.