युवारंग महोत्सवात विविध पारितोषिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:43 IST2020-02-16T12:42:31+5:302020-02-16T12:43:16+5:30
शिरपूर । आर.सी. पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांचे यश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी. पटेल औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहादा येथे झालेल्या युवारंग युवक महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात ५ मुख्य कलांमधील १७ उपकलाप्रकारांमध्ये एकूण ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या महोत्सवात शंभु राज्याभिषेक सोहळा हा सजीव देखावा पथसंचलनात सादर करण्यात आला. तसेच मूकनाट्य व विडंबन सादर करण्यात आले. स्पर्धेत आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिके पटकाविली.
योगिता रहेजा हिने मेहंदी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला़ इन्स्टॉलेशन स्पर्धेत सचिन चौधरी, नरेंद्र चोरमले, अंजली चित्ते व अंकिता देवरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. छायाचित्रण स्पर्धेत वैभव घुगे याने यश मिळविले.
स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागातील डॉ.मनोज गिरासे, डॉ.पंकज नेरकर, संदीप गिरासे, कमलेश माळी, डॉ.पद्मजा आगरकर, प्रा.सविता मंदान, प्रा.श्वेतल पवार यांचे मार्गदर्शन लाभले़
संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ.संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.