रामायणातून भारतीय संस्कृतीची मूल्ये प्रकट होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:26+5:302021-02-06T05:07:26+5:30
श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ...

रामायणातून भारतीय संस्कृतीची मूल्ये प्रकट होतात
श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, रामदास स्वामी यांचे वंशज भूषण स्वामी होते.
राज्यपाल काेश्यारी पुढे म्हणाले, आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते. अशा विद्वान, संत-महात्म्यांचा हा देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळलेला आहे. एवढेच नाही तर विदेशातही मंत्र-तंत्र, योगा याचा प्रभाव वाढत चालला आहे. जगातील विविध देशांत रामायण पोहोचलेले आहे. श्रीरामाचे समुद्रासारखे गांभीर्य आणि हिमालयासारखे धैर्य सर्वांसाठी आदर्श आहे. श्रीराम हे देशाचे सांस्कृतिक प्रतीक आहे. समर्थ वाग्देवता मंदिरात साहित्याचे भांडार आहे. समर्थ रामदासांच्या साहित्यातील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात देवेंद्र डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखितांविषयी माहिती घेतली. तसेच अभिप्रायही नोंदविला. याप्रसंगी रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या. अंबादास जोशी (मुंबई), डॉ. अरुंधती जोशी (पुणे), डॉ. रूपाली कापडे (संगमनेर), प्रा. डॉ. शोभा शिंदे (धुळे), कलनिधी वासुदेव कामत (मुंबई), बाळूबुवा
रामदासी (सातारा), हर्षवर्धन कुळकर्णी (सातारा), डॉ. नीलेश जोशी वैशंपायन (मुंबई) यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण स्वामी यांनी ‘कल्याणकारी रामदास प्रार्थना’ म्हटली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा बेडकर यांनी तर आभार डॉ. रवींद्र महाजनी यांनी मानले.
यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., ‘उत्तर महाराष्ट्र’चे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील आदी उपस्थित होते.
पाच लाखांचा निधी देण्याचे जाहीर
समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्त्वाचे असून, संस्थेच्या कार्यासाठी राज्यपाल कोशातून ५ लाख रुपये देण्याचे कोश्यारी यांनी जाहीर केले.