मुल्यवर्धनमुळे भविष्यात क्रांती होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:41 IST2020-02-05T12:41:02+5:302020-02-05T12:41:38+5:30
जिल्हास्तरीय मेळावा : शांतीलाल मुथा यांचे प्रतिपादन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुल्यवर्धन उपक्रमातून लोकशाहीचे भविष्यातील जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये सुरू आहे. सुप्तपणे सुरू असलेल्या या कार्यातून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाचे शाळांचे शिक्षक भविष्यात मोठी क्रांती घडवून आणतील असा विश्वास जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी आज येथे व्यक्त केला.
शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्यावतीने धुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या या मेळाव्यास आमदार मंजुळा गावीत, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, शिक्षणाधिकारी मनीष पवार, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील आदी उपस्थित होते.
शांतीलाल मुथा पुढे म्हणाले की, मुल्यवर्धन उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असून, भविष्यात चांगले नागरिक घडविण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या या कामाला मुथा फाऊंडेशन आपल्यापरीने सहकार्य करीत आहे.
सुजाण नागरिक तयार करण्याचे काम शिक्षण करते. विद्यार्थ्यांना मूल्ये शिकवावी लागत नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून रुजवावी लागतात असे प्रतिपादन डायटच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी केले. शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे बंद करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील असे आमदार मंजुळा गावीत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन मराठे यांनी केले. यावेळी सुरजमल सूर्या, राजेंद्र सिसोदीया, दीपक चतुरमुथा, राजू बंब, संजय चोरडिया, हरकचंद बोरा, विजय दुगड, रमेश संघवी, तुषार बाफना, योगेश संघवी, उज्वल दुगड, किर्ती ताथेड, कल्पना चोरडिया, अनुजकुमार जैन, दीपक छाजेड, रितेश बाफना, सुयोग खिंवसरा आदी उपस्थित होते.