माेटार वाहन कागदपत्रांची वैधता ३१ मार्चपर्यंत वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:49+5:302021-01-22T04:32:49+5:30
गॅस वापराबाबत महिलांना प्रशिक्षण धुळे : स्वयंपाकाच्या गॅसचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. ...

माेटार वाहन कागदपत्रांची वैधता ३१ मार्चपर्यंत वाढविली
गॅस वापराबाबत
महिलांना प्रशिक्षण
धुळे : स्वयंपाकाच्या गॅसचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. रानमळा, ता. धुळे येथील सद्गुरू गोरक्षनाथ सेवाभावी संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर आव्हाळे होते. बचत गटाच्या अध्यक्षा सुमित्रा आव्हाळे, उपाध्यक्षा निर्मला निकुम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी योगिराज आव्हाळे, नंदिनी उचाळे, वैष्णवी आव्हाळे आदींची उपस्थिती होती.
कोरोना जनजागृतीवर ज्येष्ठ नागरिकांची बैठक
धुळे : येथील विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघाची कोरोना विषयावर जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीस संघाचे कार्याध्यक्ष जे.बी. पाटील यांनी कोरोनासंबंधित ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष बी.एन. पाटील, कार्याध्यक्ष जे.बी. पाटील, एस.एस. ठाकरे, उपाध्यक्ष टी.ए. राऊळ, सुदाम पाटील, शांताराम पाटील यांच्यासह संघाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.