६५ स्पर्धकांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:50 IST2020-02-01T11:50:27+5:302020-02-01T11:50:45+5:30

जवाहर वाचनालय : ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

वितरण Distribution of prizes to competitors | ६५ स्पर्धकांना बक्षीस वितरण

Dhule

निजामपूर : जवाहरलाल वाचनालयात नुकत्याच विविध स्पर्धा झाल्या. ६५ स्पर्धक विद्यार्थ्यांना समारंभ पूर्वक बक्षिसे देण्यात आली. विविध दात्यांच्या सहकार्यातून दोन वर्षांसाठी ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
रंगभरण स्पर्धा सुशिलाबाई मुरलीधर येवले यांच्या स्मरणार्थ झाली. दोन्ही गटातून २० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. काव्यगायन स्पर्धा वषार्बेन अजितचंद्र शाह यांच्या स्मरणार्थ झाली. ५ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभात तीसरी ते १२ वीच्या ६५ विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि शैक्षणीक साहित्य वाटप झाले. २५ हजार रुपयांची पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष शरदचंद्र शाह होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य सतिष राणे, नुतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत बेडसे, आदर्श विद्या मंदिराचे प्राचार्य राजेंद्र चौधरी, ए.व्ही.एम. संस्था खजिनदार दत्तात्रय वाणी, सदस्य बारीक पगारे, सदस्य राजेंद्र येवले, माजी सरपंच अजितचंद्र शाह, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे, जगदीशचंद्र शाह, रविंद्र वाणी, वाचनालयाचे अध्यक्ष नयन कुमारशाह, सचिव नितीन शाह, वाचनालयाचे पदाधिकारी, पालकवर्ग, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
विविध दात्यांच्या सहकायार्तून एकूण ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती दोन वर्षापर्यंत ५०० रुपये प्रत्येकी देण्यात येते. जगन्नाथ कडवादास शाह, मणीलाल उत्तमदास शाह, विष्णुदास रामदास शाह, जगन्नाथ तानाजी वाणी, मुरलीधर दगडू वाणी, ईश्वरलाल दगुलाल शाह, चांद्रकांतबेन ईश्वरलाल शाह, इंदूमती रघुनाथ राणे, जी.ए.जी. पतसंस्था, प्रभावती उपाध्ये, लक्ष्मण भामरे, शांताबेन जगन्नाथ शाह, गिरिश्चंद्र कालिदास शाह, बंडू आत्माराम वाणी, भटाबाई बारीक पगारे यांच्या स्मरणार्थ सदर शिष्यवृत्ती देण्यात आली. आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष शरदचंद्र शाह यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांचे जास्तीत वाचन करावे, असे आवाहन केले. प्राचार्य राजेंद्र चौधरी चंद्रकांत बेडसे,अनिल सोनवणे यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक चंद्रकांत शिंपी, सूत्रसंचालन राजेश शाह यांनी तर आभार मनोहर राणे यांनी मानले.

Web Title: वितरण Distribution of prizes to competitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे