Vaishnavi Patil | वैष्णवी पाटील हीचा 
पुरस्कार प्राप्त मुलींसोबत संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, डॉ़उमेश शर्मा, पी़व्ही़पाटील, आऱबी़पाटील व गाईड शिक्षिका़

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या  माध्यमिक विद्यालयाची वैष्णवी नितीन पाटील हिला उत्कृष्ट गाईड  राज्य पुरस्कारासाठी राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. तिचा याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. 
वैष्णवी पाटील हिने सन २०१७-१८ या वर्षात स्काऊट-गाईडचे चांगले कार्य केल्याबद्दल  उत्कृष्ट गाईड म्हणून राज्य पुरस्कारासाठी निवड झाली होती. तसेच शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये हिताक्षी वसंत ईशी, आर्या योगेश काकुळदे, अश्विनी संतोष ईशी, हिरल उदय भलकार, दिक्षा शिशिर जोशी, मानसी ईश्वर पाटील, निर्मिती प्रदिप गहिवरे या विद्यार्थिनींनी राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. 
या सर्व  विद्यार्थिनींचा गौरव संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्याहस्ते करण्यात आला.
संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा  जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील व प्राचार्य आर.बी. पाटील  यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थिनींना गाईड शिक्षिका  ए.जे.पाटील व एस.एल.भोगे यांचे मार्गदर्शन लाभले.

 


Web Title: Vaishnavi Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.