वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी पाटील, सायली शिंदे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:31+5:302021-09-07T04:43:31+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दगडू फुला पाटील होते. प्रतिमेचे पूजन सचिव झुलाल उत्तमराव पाटील यांनी केले. ...

वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी पाटील, सायली शिंदे प्रथम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दगडू फुला पाटील होते. प्रतिमेचे पूजन सचिव झुलाल उत्तमराव पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन संचालक राजधर महादू पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिरामण पाटील, प्राचार्य सतीश देसले, पर्यवेक्षक दिलीप पाटील यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर उपशिक्षक एम. डी. पाटील यांनी प्रकाशझोत टाकला.
परीक्षक म्हणून आर. एम. पाटील, प्रा. ए. बी. बेडसे, व्ही. आर. हालोरे, एस. सी. पाटील यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान गटात प्रथम वैष्णवी बाप्पू पाटील, द्वितीय उज्ज्वला ज्ञानेश्वर पाटील, तृतीय तुळसा संजय पाटील . मोठ्या गटात प्रथम सायली संदीप शिंदे, द्वितीय तुषार संजय बागुल, तृतीय कुणाल हिरामण पाटील, तसेच उत्तेजनार्थ भाग्यश्री भीमराव गर्दे यांनी बक्षीस मिळविले. प्रास्ताविक बी.एम.पाटील, सूत्रसंचालन सांस्कृतिक कमिटीचे प्रमुख आर. एन. पाटील यांनी केले. आभार दीपक पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पितांबर पाटील, पांडू पाटील, सुपडु पाटील, प्रदीप अहिरे यांचे सहकार्य लाभले.