देवपूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:39 IST2021-08-28T04:39:55+5:302021-08-28T04:39:55+5:30
धुळे : देवपूर येथे आणखी एक लसीकरण केंद्र आजपासून सुरू होणार आहे. देवपूरमध्ये सुरू होणारे हे दुसरे लसीकरण केंद्र ...

देवपूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू
धुळे : देवपूर येथे आणखी एक लसीकरण केंद्र आजपासून सुरू होणार आहे. देवपूरमध्ये सुरू होणारे हे दुसरे लसीकरण केंद्र आहे. यापूर्वी प्रभात नगर येथील मनपा दवाखान्यात कोरोना लस देण्यात येत आहे. धरती कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. दत्तमंदिर परिसरातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले नसल्याने या भागात लसीकरण केंद्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले होते.
यापूर्वीच प्रभातनगर येथील मनपाच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू आहे. परंतु दत्तमंदिर ते नगाववारी, बिलाडीरोड, किसान पाइप, वलवाडी शिवार येथील नागरिकांना प्रभातनगर येथील दवाखान्यात जाऊन लस घेणे गैरसोयीचे ठरत आहे. कारण ते केंद्र पाच ते सहा किलोमीटर इतके लांब आहे. डॉ. धनगवाळ हॉस्पिटल हे जीटीपी चौकाजवळ आहे. जीटीपी चौक हे दत्तमंदिर ते नगाववारी तसेच बिलाडी रोड ते वलवाडी शिवार या भागातील नागरिकांसाठी नजीकचे ठिकाण आहे. त्यामुळे त्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू होत असल्याने नागरिकांना सोयीचे होणार आहे. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला मनपा उपयुक्त गणेश गिरी, माजी विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, शहर अभियंता कैलास शिंदे, डॉ.धनगव्हाळ आदी उपस्थित राहणार आहेत.