जिल्ह्यातील २ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST2021-05-07T04:37:59+5:302021-05-07T04:37:59+5:30

धुळे - जिल्ह्यातील २ लाख नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. १ लाख ७१ हजार ३६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला ...

Vaccination of 2 lakh citizens in the district completed | जिल्ह्यातील २ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

जिल्ह्यातील २ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

धुळे - जिल्ह्यातील २ लाख नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. १ लाख ७१ हजार ३६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र अतिशय कमी आहे. आतापर्यंत केवळ ३२ हजार ३७९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर आतापर्यंत ५ हजार ३४३ डोस वाया गेले आहेत.

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस घेतले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर याना लस देण्यात आली होती. त्यानंतर जेष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक व १ मे पासून १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण सुरू झाले आहे.

८३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण -

आतापर्यंत ८३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १६ हजार ४०९ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार ६१५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ६ हजार ६८० जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ८३ टक्के कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ४९ टक्के इतके आहे.

फ्रंटलाइन वर्कर्सचे उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण -

फ्रंटलाइन वर्कर्सचे उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आतापर्यंत १४ हजार ५२३ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचे प्रमाण १०७ टक्के इतके आहे. त्यातुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. केवळ तीन हजार ६९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

४५ वर्षावरील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण -

एकूण लसीकरणात ४५ वर्षावरील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या १ लाख ४१ हजार ७१५ जणांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या २२ हजार इतकी आहे.

आतापर्यंत २ लाख १५ हजार डोस मिळाले -

आतापर्यंत जिल्ह्याला २ लाख १५ हजार ४७० डोस मिळाले आहेत. त्यात सर्वाधिक कोव्हीशिल्डचा समावेश आहे. एकूण डोसपैकी कोव्हीशिल्डचे १ लाख ७१ हजार २० इतके तर कोवॅक्सिनचे ४४ हजार ४५० डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २ लाख ३ हजार ७४७ डोस टोचण्यात आले आहेत तर ५ हजार ३४३ डोस वाया गेले आहेत.

Web Title: Vaccination of 2 lakh citizens in the district completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.