मास्क वापरा अन् इतर आजारांनाही थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:32 IST2020-12-03T11:32:20+5:302020-12-03T11:32:42+5:30
धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे ...

dhule
धुळे : कोरोना विरुद्धच्या लढ्यात मास्क अतिशय महत्वाचे शस्त्र ठरले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. मास्कमुळे कोरोना सोबतच इतरही विषाणूजन्य आजार रोखले गेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आढळलेल्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.
कोरोनामुळे नागरिकांनी मास्कचा वापर केल्यामुळे कोरोना सोबतच दरवर्षी आढळणाऱ्या इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मास्कचा वापर सर्वार्थाने फायद्याचा ठरला आहे. विषाणूजन्य आजारांमध्ये दमा, सर्दी खोकला, इन्फ्ल्यूएंझा व विविध ऍलर्जी असलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. यावर्षी या आजाराचे रुग्ण कमी झाले आहे..
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढील आठवड्यात वाढेल अशी भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र मागील दोन दिवसांपासून सैनंदीं बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी २८ तर मंगळवारी २५ रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा व इतर आजारांचा संसर्ग थांबवण्यासाठी मास्क वापरने गरजेचा आहे.
ऋतू बदलल्यानंतर श्वसनाशी संबंधित आजाराचे रुग्ण वाढतात. मास्कच्या वापरामुळे यावर्षी श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळले आहे. तोंड व नाकावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतो. दर्जेदार मास्कचा वापर नागरिकांनी करावा.
-डॉ.मनिष पाटील,
जिल्हा साथरोग अधिकारी