विना परवाना इंजेक्शन विकणाऱ्याला अटक, न्यायालयात हजर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 12:35 IST2021-05-07T12:34:53+5:302021-05-07T12:35:03+5:30
धुळे शहर पोलिसांची कारवाई

विना परवाना इंजेक्शन विकणाऱ्याला अटक, न्यायालयात हजर करणार
धुळे : कोरोना आजारासाठी उपयुक्त असणारे टोक्सी इंजेक्शन छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकणे विशाल सुभाष कटारिया (३६, रा़ प्लॉट नंबर ३, गोदाई कॉलनी, सिंचन भवनाच्या पाठीमागे, धुळे) याला चांगलेच महागात पडले़ दीड लाख रुपये किंंमतीला विकत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सापळा लावून त्याला गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील सुविधा लॅब समोरुन अटक करण्यात आली़ अटकेतील विशाल कटारियाला दुपारुन न्यायालयात हजर केले जाणार आहे़