विद्यापीठस्तरावर रोव्हर-रेंजर उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:47 IST2019-03-26T22:46:30+5:302019-03-26T22:47:40+5:30
प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करण्यावर भर

dhule
अतुल जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
स्काऊट-गाईड ही एक जागतिक शैक्षणिक चळवळ आहे. मुला-मुलींमधील उपजत कला, कौशल्य गुणांची जोपासना करून त्यांना छंदाकडून चारितार्थकडे नेता यावे यासाठी स्काऊट-गाईड अभ्यासक्रमाची योजना आहे. आता विद्यापीठस्तरावर महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी रोव्हर- रेंजर उपक्रम सुरू करावा यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती धुळे जिल्हा स्काऊट आयुक्त प्रा. विलास चव्हाण यांनी दिली. त्यांच्याशी ‘लोकमत’चा झालेला संवाद असा-
प्रश्न : स्काऊट-गाईडची संकल्पना काय आहे?
प्रा.चव्हाण : स्काऊट-गाईडमध्ये बनी, कब, स्काऊट-गाईड, रोव्हर-रेंजर हे चार भाग आहेत. ३ ते २५ वयोगटातील मुला-मुलींसाठी खेळ, गोष्टी शैक्षणिक कार्यक्रम विविध उपक्रम, राष्टÑीय मेळावे, असे चार भिंतीबाहेरचे खरे आनंददायी शिक्षण देणारी तसेच संस्कारक्षम वयात राष्टÑीय एकात्मता जोपासणारी ही चळवळ आहे.
प्रश्न : जिल्हयात किती युनिट कार्यरत आहेत.
प्रा. चव्हाण : जिल्हयात स्काऊट-गाईडची सभासद संख्या ५२ हजार ७५७ एवढी आहे. तर स्काऊटचे १ हजार २४ व गाईडचे ६०८ युनिट कार्यरत आहेत. याशिवाय कबचे ७९, बुलबुलचे ७८ युनिट कार्यरत आहेत.
प्रश्न : आगामी योजना काय आहे
प्रा.चव्हाण : १२वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी रोव्हर-रेंजर उपक्रम आहे. मुबंई-नाशिक या ठिकाणीच हा उपक्रम सुरू आहे. हा उपक्रम सुरू करावा असे शासनाचे २०१७पासूनचे आदेश आहे. विद्यापीठस्तरावर रोव्हर-रेंजर उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रश्न : एनसीसी, एनएसएसप्रमाणेच स्काऊटकडे ओढा आहे का?
प्रा.चव्हाण : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच वर्दीचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे एनसीसी, एनएसएसप्रमाणे स्काऊटकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यांनाही राज्यस्तरावरील परेडमध्ये सहभागी होता येते.
सर्वोच्च पुरस्कार
४स्काऊटमधील एलिफंट हा सर्वोच्च राष्टÑपती पुरस्कार आहे. धुळ्यातील शांताराम शेंडे व भा.ई.नगराळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
४धुळ्याने भारताला दोन स्काऊट आयुक्त दिले आहेत. यात एक व्यंकटराव रणधीर व भा.ई.नगराळे यांचा समावेश आहे.
स्काऊट-गाईड ही जागतिक शैक्षणिक चळवळ आहे. यात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी झाले पाहिजे . - प्रा.विलास चव्हाण