भीमस्मृती यात्रेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST2021-07-16T04:25:30+5:302021-07-16T04:25:30+5:30
धुळे : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्पर्श झालेल्या किल्ले लळिंग (ता. धुळे) येथील लांडोर बंगल्यावर ३१ जुलै ...

भीमस्मृती यात्रेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार
धुळे : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्पर्श झालेल्या किल्ले लळिंग (ता. धुळे) येथील लांडोर बंगल्यावर ३१ जुलै रोजी होणाऱ्या भीमस्मृती यात्रेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांनी दोंडाईचा येथील बैठकीत दिली.
किल्ले लळिंग भीमस्मृती यात्रा आयोजन आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या धुळे दाैऱ्याचे नियोजन करण्यासाठी रिपाइं नेत्यांची नुकतीच दोंडाईचा येथे विचारविनिमय बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक दामोदर होते. या बैठकीचे नियोजन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक यांनी केले होते. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, संपर्कप्रमुख अनिल गांगुर्डे, दिनकर धिवरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, प्रेम अहिरे, राजूबाबा शिरसाठ, सुभाष पानपाटील, आबा खंडारे, संजय बैसाणे, महिला आघाडीच्या नयना दामोदर, मीना बैसाणे, अंजना चव्हाण, देवीदास वाघ, शिंदखेडा तालुक्यातून संजय पाटोळे, कैलास आखाडे, हर्षल मोरे, साक्री तालुकाध्यक्ष अशोक शिरसाठ, गिरीश आखाडे आदींनी मार्गदर्शन केले.
राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किल्ले लळिंग लांडोर बंगला येथे तीन दिवस मुक्काम केला होता. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर दरवर्षी ३१ जुलै रोजी भीमस्मृती यात्रा भरवून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला जातो. यंदाची भीमस्मृती यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.