सर्व शिक्षा अभियानांतर्गत १३,५९४ विद्यार्थ्यांना गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 22:17 IST2020-12-22T22:17:22+5:302020-12-22T22:17:22+5:30
विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार

सर्व शिक्षा अभियानांतर्गत १३,५९४ विद्यार्थ्यांना गणवेश
दोंडाईचा : कोरोना संसर्गचा पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीचा प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी या वर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार आहे. या नुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोंडाईचातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. दोंडाईचासह शिंदखेडा तालुक्यातील १३ हजार ५९४ विद्यार्थ्यांना एक गणवेश शिवून मिळणार आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व विद्याथीर्नीना, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्याना एक गणवेश शिवून मिळणार आहे. शाळा व शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्या नुसार तालुक्यातील ७ हजार १५९ विद्यार्थिनीना, अनुसूचित जातीतील ३ हजार ८४४ विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीच्या ५१० विद्यार्थ्यांना व ५ हजार ८१ दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना अशा एकूण १३ हजार ५९४ विद्यार्थ्याना मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून सुमारे ४० लाख ७८ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २३ डिसेंबरला नववी ते बारावीचा विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले असून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांचे वर्ग अद्याप सुरू झाले नाहीत. निधी मंजूर झाल्यावर चांगल्या प्रतीचे कापड विकत घेतले जाणार असून त्या पासून माप घेऊन गणवेश शिवून दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़