अज्ञात वाहनाची धडक दुचाकीस्वार जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 11:53 IST2019-09-05T11:53:00+5:302019-09-05T11:53:12+5:30

तरवाडेबारीतील घटना : विंचूर परिसरात हळहळ 

Unidentified vehicle hit by two wheeler | अज्ञात वाहनाची धडक दुचाकीस्वार जागीच ठार 

अज्ञात वाहनाची धडक दुचाकीस्वार जागीच ठार 

विंचूर : येथील रहिवासी असलेल्या तरुणाच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी चार वाजता ही घटना लक्षात आली. उमेश दिलीप बोरसे (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. 
या तरुणाचा धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तरवाडे बारी जवळ सदर तरूणाला मोटर सायकलवर येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज  बूधवारी चार वाजेच्या सुमारास लक्षात आली घटना लक्षात येताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत उमेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याने विंचूर पंचक्रोशीत शोककळा पसरली. गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील. उमेश हा येथील ग्रा.पं. कर्मचारी दिलीप बोरसे यांचा  मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण, वहिनी, दोन मुले व पुतणे  असा परिवार आहे. 

Web Title: Unidentified vehicle hit by two wheeler

टॅग्स :Dhuleधुळे