कंटेनरच्या धडकेत एकाचा दुर्दैवी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:29 IST2017-09-17T19:28:04+5:302017-09-17T19:29:14+5:30
सामोडा चौफुलीवरील अपघातप्रकरणी कंटेनरचालकाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल

कंटेनरच्या धडकेत एकाचा दुर्दैवी अंत
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.17 - रस्ता ओलांडणा:या अशोक सुकलाल जाधव (वय-41) यांना भरधाव वेगात असणा:या कंटेनरची शनिवारी दुपारी 1 वाजता सामोडा चौफुलीवर जोरदार धडक बसली़ यात त्यांचा मृत्यू ओढवला असल्याची घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावानजिक घडली़
साक्री तालुक्यातील पिंपळनेरनजिक असलेल्या सामोडा चौफुलीवर शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जीजे 01 डीवाय 9902 क्रमांकाच्या कंटेनरने अशोक सुकलाल जाधव (रा़ घोडय़ामाळ पिंपळनेर ता़ साक्री) यांना जोरदार धडक दिली़ ते रस्ता ओलांडत असताना अपघाताची ही घटना घडली़ जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला़ या घटनेची फिर्याद मंगला रविंद्र पानपाटील यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दुपारी 2 वाजता दाखल केली़ त्यानुसार कंटेनर चालक सईम खान सलिम खान (उत्तरप्रदेश) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल अमृतकर करीत आहेत़