जिल्ह्यातील रॉकेलचा साठा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST2021-08-25T04:40:58+5:302021-08-25T04:40:58+5:30
धुळे शहरात गेल्या वर्षापासून कोरोनामुळे अनेकांना बेरोजगारीला सामाेरे जावे लागत आहे. त्यातच गॅस व इंधनचा खर्च परवडणारा नाही. दैनंदिन ...

जिल्ह्यातील रॉकेलचा साठा पूर्ववत करा
धुळे शहरात गेल्या वर्षापासून कोरोनामुळे अनेकांना बेरोजगारीला सामाेरे जावे लागत आहे. त्यातच गॅस व इंधनचा खर्च परवडणारा नाही. दैनंदिन गरजांचे दर वाढल्याने गरिबीच्या झळा सोसाव्या लागत आहे. केंद्राची उज्ज्वला गँस योजना फसवी असल्याने तातडीने जिल्ह्यातील रॉकेलाचा साठा पूर्ववत करावा, अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी निवेदनाव्दारे केली आहे. शहरात सर्वच नागरिकांच्या शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन गेल्या चार ते पाच वर्षापासून बंद झाले आहे. त्यामुळे महागाईच्या काळात हक्काच्या रॉकेलपासून वंचित राहावे लागत आहे. महागाई तसेच गँसचा दर वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांनी गॅसचा वापर बंद केला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या बघता आणि वाढती महागाई पाहता इंधन म्हणून गॅस परवडत नसल्याने शहरासाठी केरोसीनचा साठा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी शहराचे आमदार फारूक शाह यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केली आहे.