भूमीगत गटारीचे काम निकृष्ट, रस्त्यांचीही दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:49 IST2020-06-18T21:48:46+5:302020-06-18T21:49:05+5:30
शिवसेना : वाडीभोकर रस्त्यावर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी, सत्ताधाऱ्यांवर टीका

dhule
धुळे : महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे भूमीगत गटार योजनचे काम करताना देवपूरातील रस्त्यांची पार दुरवस्था झाली असून दोन दिवसात रस्त्यांची दुरूस्ती केली नाही तर टोकाची भूमिका घेण्याचा ईशारा शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे़
शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेतर्फे गुरूवारी दुपारी वाडीभोकर रस्त्यावर खड्ड्यासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी सत्ताधाºयांच्या विरोधात जोरदार घोषबाजी करण्यात आली़
शिवसेनेन प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १३३ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामात देवपूरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे़ महापालिकेचे अभियंता या योजनेचे काम करण्यास पात्र नसल्याचे कारण पुढे करुन भाजपच्या नेत्यांनी स्वार्थासाठी सदर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले़ यापोटी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला चार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत़ धुळेकर नागरिकांचा पैसा फीच्या नावाने वाया घालविण्यात येत आहे़
कामात वापरलेल्या पाईपचा दर्जा चांगला नाही़ पाईप टाकल्यानंतर खोदकामातून निघालेल्या मटेरियलमधून काही अंशी मऊ मटेरियल पाईपावर टाकायचे़ त्यानंतर १५ सेंटीमीटर मुरूमाचे थर रोलींग करुन रस्त्याचे सपाटीकरण करावे, असे अंदाजपत्रकात नमूद आहे़ परंतु ठेकेदाराने खोदकामाचे संपूर्ण मटेरियल रस्त्यावर टाकल्यामुळे आता पावसाळ्यात माती खचल्यामुळे पाईपची लेव्हल खालीवर झाली आहे़ रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ चिखल साचला आहे़ त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे़ ठेकेदार कोट्यवधी रुपयांचे बिल घेत आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकणासह महानगरपालिका देखील याकडे का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे़ या कामात मोठ्या प्रमाणावर तडजोड होत असल्याचा अरोपही त्यांनी केला आहे़
वाडीभोकर रोडसह देवपूरातील रस्त्यांची दोन दिवसात दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाºयांना जागेवर बसु देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, सह संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, विजय भट्टड, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, जवाहर पाटील, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, पुरूषोत्तम जाधव, पंकज भारस्कर, भरत मोरे, महादू गवळी, ललित माळी, कैलास मराठे, हेमंत बागुल, योगेश पाटील, धीरज तलवारे, सुरेश गवळी आदींनी दिला आहे़