तापी नदीतून अनियंत्रीत वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:47+5:302021-04-16T04:36:47+5:30

...तर अन्य रेशन दुकानांचा पर्याय धुळे : तुमचा रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर दुसऱ्या दुकानावर जावून धान्य घ्या. ...

Uncontrolled sand extraction from Tapi river | तापी नदीतून अनियंत्रीत वाळू उपसा

तापी नदीतून अनियंत्रीत वाळू उपसा

Next

...तर अन्य रेशन दुकानांचा पर्याय

धुळे : तुमचा रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर दुसऱ्या दुकानावर जावून धान्य घ्या. गैरप्रकार करणाऱ्या रेशन दुकानदारांना वठणीवर आणण्यासाठी रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त स्वस्त धान्य दुकानांतून रेशनकार्डवर धान्य घेता यावे यासाठी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

अनियमीत वीजपुरवठ्यामुळे गैरसोय

धुळे : शहरासह ग्रामीण भागामध्ये अनियमित वीजपुरवठा मिळतो. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा केव्हा सुरू राहील, केव्हा बंद होणार याची कुठलीही सूचना दिली जात नाही. वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागातील जनता कंटाळलेली आहे. त्यात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

मेलाने रस्त्याची दुरुस्ती करा

शिंदखेडा : येथून मेलाणे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम काही दिवसापूर्वी सुरू झाले होते. मात्र, रस्त्यांचे खोदकाम झाल्यानंतर रस्ता तसाच पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याचे खोदकाम केल्याने त्या रस्त्यावर लहान अपघात होत असतात. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता दुरूस्त करण्यात आलेला नाही.

कर्णकर्कश हाॅर्नची वृद्धांना डोकेदुखी

धुळे : शहरातील न्यायालय, रुग्णालये आदी सायलेंट झोनमध्ये देखील जोराने हाॅर्न वाजविण्याचे प्रमाण वाढल्याने डोकेदुखी ठरत आहे. अनलॉक झाल्यापासून रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र तरूण मंडळी रात्रीच्यावेळी कर्कश हॉर्न वाजवत भरधाव वेगाने गाडी चालवित असतात. त्याचा कॉलनी परिसरातील रहिवाशांना त्रास होत असतो. कर्कश हॉर्न वाजवून भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव

धुळे : हिवाळा लागल्यापासून शहरासह परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील दाट लोकस्तीतच नव्हे तर काॅलनी परिसरात देखील डासांचे प्रमाण अधिक आहे. विरळ काॅलनी परिसरात मोकळे प्लाॅट आणि मैदानांमध्ये साचलेल्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. उपाययोजनांची मागणी होत आहे.

Web Title: Uncontrolled sand extraction from Tapi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.