शिरपूर बसस्थानकासमोर विना परवानगी दारु विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 09:48 PM2018-04-15T21:48:27+5:302018-04-15T21:48:27+5:30

पोलिसांची कारवाई : अडीच हजाराच्या दारु बाटल्या जप्त

Unauthorized liquor sale in front of Shirpur bus stand | शिरपूर बसस्थानकासमोर विना परवानगी दारु विक्री

शिरपूर बसस्थानकासमोर विना परवानगी दारु विक्री

Next
ठळक मुद्देविना परवानगी दारु विक्री शिरपूर बसस्थानकासमोर घटनापोलिसात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकासमोर असलेल्या विना परवानगी दारुची होणारी चोरटी विक्री पोलिसांनी छापा टाकून रोखली़ सुमारे अडीच हजाराचा मुद्देमालही जप्त केला असून एकाविरुध्द गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ या कारवाईचे परिसरात कौतूक होत आहे़ 
शिरपूर शहरात ठिकठिकाणी चोरट्या पध्दतीने दारुची विक्री सुरु आहे़ सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी  पोलिसांनी पथक तयार केले आहे़ त्यांच्या माध्यमातून छापा टाकत चोरट्या मार्गाने विक्री होणारी दारु पकडली जात आहे़ 
शिरपूर येथील बसस्थानकाच्या समोर आॅमलेट विक्री करणाºया लोटगाडीच्या अडोश्याला विना परवानी परमीटशिवाय चोरट्या मार्गाने दारु विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली़ तातडीने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकला़ या छाप्यात ज्ञानेश्वर पंडीत माळी (४१, रा़ वरवाडे ता़ शिरपूर) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने २ हजार ४९६ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या काढून दिल्या़ देशी दारु विक्री करण्याची कोणतीही परवानगी त्याच्याकडे नसल्याचे चौकशीतून समोर आले़ 
याप्रकरणी लक्ष्मीकांत पंढरीनाथ टाकणे यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित ज्ञानेश्वर माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ व्ही़ एम़ देवरे तपास करीत आहेत़

Web Title: Unauthorized liquor sale in front of Shirpur bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.