जिल्ह्यात बलुतेदारांचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:22 IST2020-06-02T22:22:15+5:302020-06-02T22:22:40+5:30
लॉकडाउनमुळे व्यवसायात नुकसान : आर्थिक मदतीची मागणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनच्या काळात बलुतेदारांचे व्यावसायिक नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी विश्वकर्मीय सुतार, लोहार बलुतेदारांनी एक जूनला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले़
बलुतेदारांचा पारंपारिक व्यवसाय कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ लॉकडाउनमुळे तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ इतर घटकांप्रमाणे बलुतेदारांना देखील शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे़
विश्वकर्मा सुतार क्रांती संघटना धुळे, कारागीर आणि बांधकाम कामगार यांनी एक जूनला लाक्षणिक उपोषण केले़ धुळे जिल्ह्यातील बलुतेदार जिल्हाधिकाऱ्यांसह तहसिलदारांना निवेदन देणार होते़ परंतु सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने ग्रामीण भागातील बलुतेदारांना धुळ्यात येणे शक्य झाले नाही़ त्यामुळे घरी राहुनच लाक्षणिक उपोषण केले़
धुळे तालुक्यातील शिरुड येथे बाळासाहेब पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी सुनील शार्दुल, धर्मराज बोरसे, राजेंद्र जगताप, भानुदास अहिरे, चुडामणे खैरनार, काशिनाथ मिस्तरी, सी़ के़ मिस्तरी, शशीकांत देवरे आदींनी अवजारे बाहेर ठेवून फिजीकल डिस्टन्सिंग पाळत लाक्षणिक उपोषण केले़