तीन घटनांनी हादरला होता जिल्हा
घटना क्रमांक १
शिंदखेडा तालुक्यातील होळ शिवारातील रेल्वेस्टेशन पटरीजवळ सुनीता लक्ष्मण सोनवणे (वरपाडा, ता. शिंदखेडा) या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापून डोक्याला दुखापत करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील सुभाष संतोष कोळी (३९) याने केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. हा गुन्हा केल्यानंतर सुभाष कोळी हा फरार झाला होता. तो अटक चुकविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले़
घटना क्रमांक २
धुळे तालुक्यातील चिंचखेडे गावातील शेतकरी विजय हरी मोरे (३०) यांनी गेल्या वर्षी टरबूज विक्रीसाठी काढले. त्यावेळी मालेगाव येथील मुश्ताक मामू शेख, मोहम्मद मुश्ताक अब्दुल बशीर बागवान व शकीलभाई नामक व्यक्ती यांनी संपर्क साधला. ९ लाख ७९ हजार रुपयांत व्यवहार ठरला. त्यापैकी ४ लाख ७९ हजार रुपये शिल्लक ठेवले. त्यासाठी संबंधितांनी धनादेश दिले. हे धनादेश बँक खात्यात टाकण्यात आले असता ते वटले नाहीत. आपल्याला गंडा घातला असल्याची जाणीव होताच धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली़
घटना क्रमांक ३
धुळे शहरातील मालेगाव रोडवर रेल्वे क्रॉसिंगच्या थोडे पुढे गेल्यावर शनिमंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे दीपक शर्मा यांनी गोदाम बांधले असून ते व्यापारी जयंत बाळकृष्ण पाखले यांनी भाडेतत्त्वावर घेतले होते़ पाखले हे नेहमीच गोदामाबाहेर अगरबत्ती लावतात. पण, त्यांनी अगरबत्ती गोदामात लावली. सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक अगरबत्तीची ठिणगी बारदान्यावर पडली आणि पेट घेतला. त्यात जयंत पाखले (४६) आणि अरुण पाटील (६०) भाजले गेल्याने दोघांचा मृत्यू झाला़
खून
२०२० : २७
२०२१ : ११
अत्याचार
२०२० : ३२
२०२१ : १६
फूस लावून पळविणे
२०२० : २७
२०२१ : १२