बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 22:00 IST2020-12-05T22:00:14+5:302020-12-05T22:00:33+5:30
शिरपूर ते शिंदखेडा दरम्यानची घटना

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
धुळे : समोरुन येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर ३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात बसचालकाविरुध्द ४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.
एमएच १४ बीटी ०४६० क्रमांकाची शिरपूर आगाराची बस शिरपूरकडून शिंदखेडाकडे येत होती. शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर या बसने एमएच १८ एके ५८४६ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. यात गंगाराम नासºया पावरा (२१, रा. अंजनपाडा ता. शिरपूर, हल्ली मुक्काम दसवेल ता. शिंदखेडा) आणि आकाश नाना पाटील या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंगाराम पावरा यांचा मृत्यू झाला असून आकाश पाटील याच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी वकील नासºया पावरा (३५, रा. अजंनपाडा ता. शिरपूर) याने शिंदखेडा पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता फिर्याद दाखल केल्याने बसचालक कैलास गोपाल सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.