भरधाव वेगाने घेतला दोन जणांचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:52 PM2020-01-23T22:52:18+5:302020-01-23T22:52:37+5:30

धुळे तालुका : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात, गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

Two victims 'victims' speeding up | भरधाव वेगाने घेतला दोन जणांचा ‘बळी’

भरधाव वेगाने घेतला दोन जणांचा ‘बळी’

Next

न्याहळोद/कापडणे : तालुक्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दोन जणांना जागीच आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. घटनेनंतर दोन्ही ठिकाणीही वारंवार मागणी करुनही गतीरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला.
महामार्गावरील घटना
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक कुंडाणे फाट्यावर भरधाव वेगाने येणाºया ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील राजेंद्र बन्सीलाल भावसार (५२) यांचा जागीच मृत्यू झाला़
अपघाताची ही घटना गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता घडली़ भावसार हे एमआयडीसी येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कामावरुन घरी परत येत असताना हा दुर्देवी अपघात घडला़ कुंडाणे फाट्यावर गतीरोधक बसविण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी सकाळी ९ वाजता महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत़ ग्रामस्थांनी एकत्र येऊन महामार्गावर गतिरोधकाच्या मागणीसाठी काही काळ रास्ता रोको आंदोलन छेडले होते़ परिणामी अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती़ महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली़ दरम्यान, कुंडाणे फाट्यावर नेहमी अपघात होत असतात़
मयत राजेंद्र भावसार हे न्याहळोद येथील राहणार होते. यंदा शेतात अतिवृष्टीमुळे आर्थिक उत्पन्न आले नव्हते़ परिणामी घराचा संसार चालविण्यासाठी ते एमआयडीसी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामास जात होते़ काम आटोपून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला़ या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला़
तामसवाडीजवळील अपघात
कापडणे - धुळे तालुक्यातील धनुर येथील न्हावी वाड्यातील रहिवासी सुरेश उत्तम सैंदाणे उर्फ राजु न्हावी (४५) या विवाहित युवकाला गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धनुर तामसवाडी रोडावर डोंगरगाव फाट्याच्या मध्यंतरी हिरामण विठ्ठल चौधरी यांच्या शेताजवळील भागात भरधाव वेगाने येणाºया डंपरने धडक दिली़ यात तो ठार झाला़ त्याच्यासोबत असलेल्या १० बकऱ्यांचाही जीव गेला़
एमएच १८ बीजी ७११७ क्रमांकाच्या या रिकाम्या भरधाव डंपरने धडक दिली़ डंपर चालक महेश विलास पाटील हा देखील धनुर येथील शिवाजी नगर मधील रहिवासी असून, त्याला सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ रोडावर डंपरच्या अपघातात मयत झालेला बकºया चालणारा सुरेश उत्तम सैंदाणे हा सायंकाळी आपल्यासोबत शेतातून बकºया चारुन घरी घेऊन जात असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाºया डंपरने जोरदार धडक दिली़ यात गंभीर जखमी झाल्याने सुरेशचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्या सैंदाणे सोबत एकूण ३० ते ३२ बकºया होत्या़ त्यापैकी सैंदाणेसह १० बकºया ही डंपरच्या जोरदार धडकेत ठार झाले आहेत़ तर अन्य दहा ते पंधरा बकºया जबर जखमी झालेले आहेत़ अपघातात ठार झालेल्या सैंदाणाचा मृतदेह घटनास्थळी सुमारे तीन तास पडून होता़ यावेळी धनुर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी डंपरच्या मालकाला बोलवण्यासाठी, घटनेची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि गतिरोधकाच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले़ पोलिसांना अनेकवेळा संपर्क साधल्यानंतर पोलिस उशिरा पोहोचले़ मात्र डंपर मालक घटनास्थळी पोहोचला नाही़ अखेर रात्र झाल्यामुळे सैंदाणे यांचा मृतदेह ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने नेण्यात आला़ सदर घटनेचा सोनगीर पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती़मयत सुरेश सैंदाणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा शोकाकुल परिवार आहे़ ते मनीषा सुरेश सैंदाणे यांचे पती, तर मुलगी आठवीच्या वर्गात शिकणारी योगिता सैंदाणे, लहान मुलगी हर्षदा सैंदाणे यांचे वडील तर हरिचंद्र उत्तम सैंदाणे यांचे ते भाऊ होत़
आज अंत्ययात्रा
मयत सुरेश सैंदाणे यांची अंतयात्रा शुक्रवार २४ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता धनुर येथील राहत्या घरून निघणार आहे, मयत सुरेश सैंदाणे हा गावात अत्यंत मनमिळावू व प्रेमळ होता यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण धनुर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन्ही बाजुंनी लागल्या वाहनांचा रांगा
धुळे तालुक्यातील कुंडाणे फाटा आणि सौंदाणे रोडवर अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्तारोको आंदोलन छेडले़ वेगाने जाणाºया वाहनांवर नियंत्रण ठेवा आणि तातडीने गतिरोधक बसविण्यात यावी या प्रमुख दोन मागण्या त्यांनी सादर केल्या होत्या़ यावेळी सकाळी आणि सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण झाले होते़

Web Title: Two victims 'victims' speeding up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे