ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार, दोन जखमी
By Admin | Updated: March 9, 2017 23:40 IST2017-03-09T23:40:32+5:302017-03-09T23:40:32+5:30
धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत़

ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार, दोन जखमी
धुळे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत़ हा अपघात साक्री तालुक्यातील डांबरी रोडवर घडला़ याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सुरेश गणेश भिल (वय ३१) असे मयत तरुणाचे नाव आहे़ तर रमेश तुकाराम धोबी, भरूनाना कोळी तिघे (रा़ शनिमांडळ तलवाडे खुर्र्दे, ता़जि़ नंदुरबार) हे दोघे जखमी झाले आहेत़ हे तिघे ६ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला (क्ऱ एमएच ३९-एस ९२७७) हट्टी खुर्दे रोडदरम्यान डांबरी रोडवर समोरून येणाºया ट्रकने (क्ऱ एमएच १८-एए ९९७०) जोरदार धडक दिली़ त्यात तिघे जखमी झाले़ तर दुचाकीचालक सुरेश भिल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला.
याप्रकरणी रमेश गणेश भिल याने निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपघात करून एकाच्या मृत्यू व दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने व दुचाकीचे नुकसान केल्याने ट्रकचालक ज्ञानेश्वर शांतीलाल शिंदे (वय २७, रा़ हट्टी खुर्द ता़साक्री) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पो़हेक़ॉ. बहिरम करीत आहेत़