दोन हजार कुटुंबीयांना अतिवृष्टीचा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:18 IST2021-09-02T05:18:05+5:302021-09-02T05:18:05+5:30
दोन दिवस झालेल्या पावसात शहरातील बिलाल मस्जिदजवळील शंभर फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी ...

दोन हजार कुटुंबीयांना अतिवृष्टीचा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी
दोन दिवस झालेल्या पावसात शहरातील बिलाल मस्जिदजवळील शंभर फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी रोड, चित्तरंजन कॉलनी, गजानन कॉलनी, जनता सोसायटी, हजार खोली, जामचा मळा, मौलवी गंज, समता नगर, भाईजी नगर, काजी प्लॉट, देवपूरमधील विटा भट्टी, आधार नगर, अंदरवाली मस्जिद, नेहरू नगर, लक्ष्मीवाडी मिल परिसर व देवपूर तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात सुमारे दोन हजार कुटुंबांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत आमदार फारूक शाह यांनी आयुक्त अजीज शेख यांना माहिती दिली व तातडीने पाहणीचे आदेश दिलेत. यावेळी अभियंता कैलास शिंदे, नगररचनाकार महेंद्र परदेशी, हेमंत पावटे, सेहबाज फारूक शाह, परवेज शाह, नगरसेवक युसुफ मुल्ला, गनी डॉलर, मनपा विद्युत विभागातील गितेश सोनार, पराग ठाकरे, आसिफ पोपट शाह, सिद्धार्थ जगदेव, रईस शाह, रियाज शाह, सउद सरदार आदी उपस्थित होते.