दोन चोरट्यांना मुद्देमालासह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:11 IST2019-11-17T12:10:52+5:302019-11-17T12:11:27+5:30

नरडाणा : एक लाख २४ हजारांचा मुद्देमाल

Two thieves caught with issue | दोन चोरट्यांना मुद्देमालासह पकडले

Dhule

नरडाणा : येथे शेतात लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवर खालील बॅटऱ्या मध्यरात्री चोरून नेत असताना चोरट्यांना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात येथील पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याजवळून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला
गावाजवळून जाणाºया मुंबई -आग्रा राष्टÑीय महामार्गावर बसवण्यात आलेल्या एका मोबाईल टॉवरखालील लावलेला बॅटºया चोरटे चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी छापा मारून बॅटºया चोरणारे चोरटे एक इंडिका कार जप्त केली आहे. यात बॅटऱ्यांची किंमत २४ हजार रुपये एवढी असून त्यांच्याकडून एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी अतिकूल रहमान मोहम्मद सलीम अन्सारी व मोहम्मद हमीद रशीद अन्सारी (२७) रा. मौलवीगंज धुळे या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. राहुल विक्रम अहिरे यांच्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनात आत्माराम माळी, अशोक पाटील, भीमराव बोरसे, दिनकर वसावे, शांतीलाल पावरा आदींनी ही कारवाई केली

Web Title: Two thieves caught with issue

टॅग्स :Dhuleधुळे