ट्रक लूट प्रकरणातील दोघा संशयितांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:44 IST2019-12-17T14:44:15+5:302019-12-17T14:44:42+5:30
सोनगीर पोलीस : सरवडनजिक घडली होती घटना

ट्रक लूट प्रकरणातील दोघा संशयितांना पकडले
धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील सरवड गावाजवळ ट्रकचा पाठलाग करुन चालकाला मारहाण करण्यात आली होती़ त्याच्याजवळील रोख रक्कम घेऊन दोघांनी पोबारा केला होता़ याप्रकरणी सोनगीर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास कामाला वेग दिला होता़ यात दोन संशयितांना पकडण्यात सोनगीर पोलिसांना यश आले आहे़ दरम्यान, त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़