बारापत्थर चाैकात दोन दुकानांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:59+5:302021-06-06T04:26:59+5:30
धुळे : येथील बारापत्थर चाैकात दोन दुकानांना लागलेल्या आगीत कुशन आणि स्पेअर पार्टस् चे साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान ...

बारापत्थर चाैकात दोन दुकानांना आग
धुळे : येथील बारापत्थर चाैकात दोन दुकानांना लागलेल्या आगीत कुशन आणि स्पेअर पार्टस् चे साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांनी अग्नी उपद्रवाची नोंद केली आहे.
धुळे शहरात बारा पत्थर चाैकात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला एका कुशनच्या दुकानाला आणि शेजारील स्पेअर पार्टसच्या दुकानाला अचानक आग लागली. कुशनचे साहित्य आणि आॅईचे साहित्य जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा वर्षाव करुन आग विझविली. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी साैम्य बळाचा वापर केला. परिस`थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास`थळी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितिन देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत दिलिप हिरालाल कदम यांनी दिलेल्या माहितीवरुन शहर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. रेक`झीन सीट कव्हर, बॅग, लोखंडी डिक्की, फोम, कुशन यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे.