उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:50+5:302021-05-10T04:36:50+5:30
अस्वस्थ रुग्णास दिलासा मिळणार आहे. मार्च -एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्ण संख्या खूपच वाढली . ...

उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दाखल
अस्वस्थ रुग्णास दिलासा मिळणार आहे.
मार्च -एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्ण संख्या खूपच वाढली . रुग्णसंख्या वाढत असतानाच बाहेरून ऑक्सिजन पुरवठा पण वाढला.ऑक्सिजन पातळी कमी होऊन ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याची संख्या पण वाढली. मार्च-एप्रिल महिन्यात दोंडाईचात ६० जण मरण पावलेत. बऱ्याच वेळी अस्वस्थ रुग्ण दाखल करत असतानाच मृत होतात.ऑक्सिजन सिलिंडरने ऑक्सिजन पुरविणे त्यात वेळ जातो.रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी स्थिर राखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असते.रुग्णास औषधी बरोबरच ऑक्सिजनची गरज भासते.
बऱ्याच वेळी ऑक्सिजन युक्त बेड मिळत नाही.अशावेळी ऑक्सिजन युक्त बेड मिळेपर्यंत रुग्णास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनने तत्काळ बाहेरून ऑक्सिजन देऊन रुग्णास जीवदान मिळू शकते. उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध झाले असून त्याची चाचणी पण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी भूषण काटे यांनी दिली .
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन हवेच्या माध्यमाने दिवसाला पाच लिटर ऑक्सिजनची निर्मिती करते.एवढा ऑक्सिजन एका रुग्णास पुरेसा असतो.
दरम्यान, घरी उपचार करून घेणाऱ्या बऱ्याच रुग्णांनी हे मशीन घेतले तेव्हा ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था केली आहे. काही व्यावसायिकांनी सदर मशीन भाडोत्री तत्त्वावर देणे सुरू केल्याने रुग्णाची सोय झाली आहे.