धुळ्यात आणखी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 22:29 IST2020-04-25T22:29:16+5:302020-04-25T22:29:47+5:30
धुळे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच असुन शनिवारी रात्री आनखी दोन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ ...

dhule
धुळे शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच असुन शनिवारी रात्री आनखी दोन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात पोझिटिव्ह रूग्णांची संख्या २३ झाली आहे़ तर चार जणांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे़
गेल्या आठवड्याभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे़ दरम्यान शहरात आणखी दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शहराच्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़