धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३३ अहवालांपैकी दोन अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. मोहम्मदीया नगर देवपूर येथील ३५ वर्षीय पुरूष व माळी गल्ली शिरपूर येथील ८ वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या २४० वर पोहोचली आहे.अशी माहिती हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दीपक शेजवळ यांनी दिली़
आणखी दोन अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:53 IST