आणखी दोघांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:21 IST2020-05-26T18:01:00+5:302020-05-26T18:21:28+5:30
जिल्ह्यातील ११८ रूग्णांना कोरोनाची बाधा

dhule
धुळे- शहरातील गल्ली नंबर चार व पिंपळनेर येथील महिलेचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ११८ वर पोहोचली आहे. ८१ अहवालांची प्रतिक्षा आहे मंगळवारी येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १६ रूग्णांचे नमुने घेण्यात आले. तर जिल्हा रूग्णालयातही १६ रूग्णांचे स्वब घेण्यात आले. जिल्हा रूग्णालयाचे ४९ स्वब याआधीच प्रलंबीत आहेत. जिल्ह्यातील ११८ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १७५८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.