शिरपूरात आणखी दोन रूग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:52 IST2020-05-27T12:51:53+5:302020-05-27T12:52:23+5:30

रूग्णांची संख्या १२० झाली

 Two more patients in Shirpur tested positive | शिरपूरात आणखी दोन रूग्ण पॉझिटिव्ह

dhule

धुळे आताच जिल्हा रुग्णालय धुळे येथील आलेल्या २३ अहवालानुसार उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. सदरील व्यक्ती हे परवा पॉजिटिव्ह आलेल्या पाटीलवाडा शिरपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील ७१ वर्ष पुरुष व ६९ वर्ष वयाची महिला आहेत. दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल आहेत. दरम्यान जिल्हयातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२० झाली आहे़ आज २१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे़ त्यात रतनपुरा व वडेलचे १६, धुळे शहरातील ३, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २ दोघांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा करोना नोडल अधिकारी डॉ विशाल पाटील यांनी दिली़
 

Web Title:  Two more patients in Shirpur tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे