ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:01 IST2020-01-25T23:00:33+5:302020-01-25T23:01:45+5:30
सावळदे फाट्यावरील रात्रीची घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
धुळे : ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना धुळे तालुक्यातील सावळदे फाट्यावर शनिवारी रात्री घडली़ यात प्रविण श्रीराम चौधरी (५२) हे गंभीर जखमी झाले़ त्यात त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातात त्यांच्या दुचाकीचा देखील चेंदामेंधा झाला़ घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते़