तापी काठावरील अडीचशे वर्ष जुनी स्वयंभू गणेश मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:44 IST2021-09-16T04:44:37+5:302021-09-16T04:44:37+5:30
गावात आयुर्वेद तज्ञ महिपती महाराज यांना मातीची टेकडी खोदतांना ही मूर्ती हाती लागली. आणि तीची स्थापना ग्रामस्थांनी त्याचठिकाणी केली. ...

तापी काठावरील अडीचशे वर्ष जुनी स्वयंभू गणेश मूर्ती
गावात आयुर्वेद तज्ञ महिपती महाराज यांना मातीची टेकडी खोदतांना ही मूर्ती हाती लागली. आणि तीची स्थापना ग्रामस्थांनी त्याचठिकाणी केली. सदरची मूर्ती ३ फुट उंचीची असून ती पाषाणाची आहे. या मंदिरात वर्षभरातून माघ शुध्द चतुर्थीला व भाद्रपद महिन्यात गणेश जन्मालापालखी व किर्तन सोहळा। भजन सहस्त्रावर्तन कार्यक्रम केले जातात. या सिध्दीविनायकाचा दर्शनाला हृदयनाथ मंगेशकर व नामवंत कलाकार येवून गेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम याच मंदिरात साजरे केले जातात़ या संस्थानच्या गादीवर तुकाराम बुवा, महिपती बुवा, गणपती बुवा, लक्ष्मीकांत भावे बुवा व मोरेश्वर भावे बुवा हे विराजमान झालेले आहेत.
अमळनेरच्या सखाराम महाराजांची फिरस्तीयात्रा सुरू होण्यापूर्वी येथील गणपती मंदिरात येऊन दर्शन घेतात. नंतरच त्यांच्या फिरस्तीयात्रेला सुरूवात केली जाते. गावातील भाविक रोज सकाळ-संध्याकाळी याठिकाणी दर्शनाला येत असतात.