धुळे : धुळे तालुक्यातील लळींग कुरणात फिरण्यासाठी गेलेल्या धुळ्यातील दिलदार नगरातील दोन मित्रांचा ‘मैत्री दिवशी’ तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. हाकीब मोहम्मद आरीफ (१४) व अरबाजखान मुसा खान (१६) अशी दोघ मयतांची नावे आहेत. दरम्यान १५ दिवसांपुर्वीच लळींग कुरणातील तलावात तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला होता़चाळीसगाव रोडवरील भंगार बाजाराच्या मागील बाजूस दिलदार नगरात राहणारे हाकीब मोहम्मद आरीफ, आणि अरबाजखान मुसा खान हे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळींग कुरणात फिरण्यासाठी गेले होते़ याठिकाणी दगडी नाला तलावात पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ या दोघांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले़ सायंकाळी उशिरा मोहाडी पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली़ या घटनेमुळे दिलदार नगरात हळहळ व्यक्त करण्यात आली़
लळींग तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:44 IST