दोघा शेतकऱ्यांनी संपविले ‘जीवन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:10 IST2020-02-03T23:09:42+5:302020-02-03T23:10:10+5:30
खान्देशातील घटना : व्यक्त होतेय हळहळ

दोघा शेतकऱ्यांनी संपविले ‘जीवन’!
शिंदखेडा : अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम कोलमडला़ त्यातच सततची नापिकीमुळे कजार्चा बोजा वाढला, हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या दसवेल (ता़ शिंदखेडा) येथील शेतकºयाने आत्महत्या करत जीवन संपवले.
शिंदखेडा तालुक्यातील दसवेल येथील शेतकरी प्रकाश हिलाल पाटील गत काही दिवसांपासून कर्जाच्या विवंनचनेत फिरत होते. सलग ३ वर्ष कोरडा दुष्काळ आणि या वर्षी अतिवृष्टी यामुळे बँकेचे कर्ज फिटले नाही. त्यांच्यावर एसबीआय बँकेचे ३ लाख कर्ज आहे. हंगामासाठी नातलाग कडून हात उसनवारीवर घेतलेले पैसे पण फिटत नाहीत. याची चिंता होती. आता जाहीर झालेल्या कर्ज माफीचा पण लाभ मिळणार नाही. आता कर्ज कसे फिटेल यांची विवंचना प्रकाश पाटील यांना होती, याच विवंचनेत त्यांनी होळ गावाजवळ रेल्वेरुळावर धावत्या रेल्वेच्या खाली येत आत्महत्या केली. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्या नंतर गावकºयांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, २ भाऊ, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.