अज्ञातांनी केली दोन कारची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:20 IST2020-07-13T21:20:38+5:302020-07-13T21:20:54+5:30
पहाटेची घटना : अद्याप गुन्ह्याची नोंद नाही

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील खंडेराव बाजार चौक भागात लावण्यात आलेल्या दोन कारची अज्ञात इसमांनी तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तोडफोड करणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले आहेत़
शहरातील जुना आग्रा रोडवरील खंडेराव बाजार चौकात गोरक्षक संजय शर्मा आणि संतोष लगडे यांच्या एमएच १८ बीसी ४५५४ आणि एमएच २० सीएस १८८९ क्रमांकाच्या कारच्या तोडफोड केली. काचा फोडण्यात आल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, हद्दीच्या वादावरुन पोलिसात नोंद केली नसल्याचे संजय शर्मांनी सांगितले़