वीज कंपनीच्या दोन लाचखोर अधिकाºयांना रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:47 IST2019-11-22T22:46:58+5:302019-11-22T22:47:29+5:30
शिरपूर : वीज ठेकेदाराकडून ७१ हजाराची लाच घेतली

वीज कंपनीच्या दोन लाचखोर अधिकाºयांना रंगेहात पकडले
शिरपूर : वीज कंपनीचे ठेकेदाराकडून ७१ हजारांची लाच घेतांना शिरपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुदर्शन साळुंखे आणि सहायक अभियंता स्वप्नील माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्यांच्याच कार्यालयात रंगेहात पकडले.
वीज कंपनीचे नवीन इलेक्ट्रीकल्स लाईन टाकणे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बसविणे, एन.ए.प्लॉटिंगमध्ये जुनी लाईन शिफ्टींग करणे यासारखे काम करणाºया शिरपूर येथील ठेकेदाराकडून उपकार्यकारी अभियंता सुदर्शन साळुंखे यांनी एक लाखांची लाच मागितली. त्यापैकी ५० हजाराचा पहिला हप्ता स्विकारला. त्यानंतर ठेकेदाराने धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारी अनुसार शुक्रवारी दुपारी उपकार्यकारी अभियंता साळुंखे यांच्या दालनात सहायक अभियंता स्वप्नील माळी यांनी २१ हजार रुपयाची लाच स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्ही अधिकाºयांना रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघा अधिकाºयांविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई करणाºया पथकात पोलीस उप अधीक्षक सुनील कराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मनजितसिंग चव्हाण आणि त्यांच्या पथकातील पोेहेकॉ जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, प्रकाश सोनार, भुषण खलाणेकर व सुधीर मोरे यांचा समावेश आहे.