महानगरातील अल्पसंख्याक प्रभागात दोन अंगणवाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:02+5:302021-03-04T05:08:02+5:30
बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ० ते ०३ या वयोगटात आणि गरोदर मातांना आणि होणाऱ्या बालकांना आहारातील ...

महानगरातील अल्पसंख्याक प्रभागात दोन अंगणवाड्या
बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ० ते ०३ या वयोगटात आणि गरोदर मातांना आणि होणाऱ्या बालकांना आहारातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण थांबविणे अ जीवनसत्त्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्त्वाचे घटक असलेले पोषण आहार पुरविण्याचे काम अंगणवाडीत होते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आ. फारुक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अंबिकानगर आणि मिरजकरनगर येथे दोन अंगणवाडी क्र. १८२ आणि १८३ यांचा शुभारंभ आ. फारुक शाह यांचे धाकटे बंधू सलीम अन्वर शाह आणि महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ लिपिक कोकणी, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, नीलेश काटे, रजनी पाटील, सुरेखा महाले, ताहेरा आफा, शहराध्यक्ष नुरा शेख, परवेज शाह, मुजम्मील शाह, सुनीता पाटील, अलका वाघ, अनिता पाटील, वसंत पाटील, गणेश परदेशी, शुभांगी खैरनार, लता करनकाळ, इबा ठेकेदार, छोटू हाजी, गफ्फार शाह, राहुल काटे आदी उपस्थित होते.