सिमेंटच्या दुकानातून अडीच लाखांची दारू जप्त

By Admin | Updated: July 17, 2017 18:13 IST2017-07-17T18:13:31+5:302017-07-17T18:13:31+5:30

साक्रीतील अनु सिरॅमिक या सिमेंटच्या दुकानात सोमवारी पोलिसांनी धाड टाकत सुमारे अडीच लाखांची दारु जस्त केली़

Two-and-a-half million liquor seized from cement shop | सिमेंटच्या दुकानातून अडीच लाखांची दारू जप्त

सिमेंटच्या दुकानातून अडीच लाखांची दारू जप्त

ऑनलाईन लोकमत

साक्री,दि.17 - साक्रीतील अनु सिरॅमिक या सिमेंटच्या दुकानात सोमवारी पोलिसांनी धाड टाकत सुमारे अडीच लाखांची दारु जस्त केली़ याप्रकरणी एका संशयिताविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री गावात अनु सिरॅमिक या सिमेंटच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्कचे धुळे पथक आणि साक्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धाड टाकली़ या धाडीत सिमेंटच्या दुकानात विदेशी दारु आणि बियरचे 45 बॉक्स सापडले असून त्याची किंमत सुमारे 2 लाख 65 हजार 920 इतकी आह़े हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आह़े 

Web Title: Two-and-a-half million liquor seized from cement shop