सव्वादोन लाखांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:41 IST2020-06-17T21:41:14+5:302020-06-17T21:41:34+5:30
एलसीबीची कारवाई : मध्यप्रदेशातील दोन मद्यमाफियांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

dhule
बोराडी : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी परवानगी नसलेला सव्वादोन लाखांचा दारुसाठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात पकडला़ याप्रकरणी मध्यप्रदेशच्या दोन मद्यमाफियांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मद्यमाफियांच्या मॅनेजरसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
मंगळवारी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमाराला शिरपूर तालुक्यातील मालकातर गावात पोलिसांनी ही कारवाई केली़ मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात पानसेमल मालुक्याच्या मोयदा गावातील रहिवासी गुरमितसिंग दिलिपसिंग वधवा आणि दिलिपसिंग लालसिंग वधवा हे दोघे मध्यप्रदेश राज्यातून देशी, विदेशी दारु खरेदी करुन तिची महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याची परवानगी नसताना देखील ते पानसेमलमार्गे दारुसाठ्याची तस्करी करुन मालकातर गावात व आजुबाजुच्या परिसरात विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती़ त्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकाला छापा मारण्याच्या सूचना दिल्या़
त्यानुसार १६ जून रोजी रात्री मालकातर गावात एका मंदिराजवळ पोलिसांनी सापळ रचून एम़ एच़ १८ ए़ ए़ २२३० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची पीकअप गाडी अडविली़ त्यात वेगवेगळ्या कंपनीचा विदेशी दारुचा दोन लाख ३० हजार ४० रुपये किंमतीचा साठा आढळून आला़
यावेळी पोलिसांनी वाहनचालक मुकेश जगु पावरा रा़ मालकातर, रमेशचंद्र नारायणप्रसाद शिवहरे रा़ मोयदा मध्यप्रदेश या दोघांना पकडले तर भूºया राजाभाऊ पावरा रा़ मालकातर हा फरार झाला़ पोलिसांनी विचारपूस केली असता रमेशसिंग शिवहरे हा मॅनेजर असून गुरमितसिंग वधवा आणि दिलिपसिंग वधवा यांच्या सांगण्याप्रमाणे सदर मद्याची महाराष्ट्रात विक्री करीत असल्याची माहिती समोर आली़
याप्रकरणी वाहनचालक मुकेश पावरा रा़ मालकातर, रमेशचंद्र शिवहरे, भुºया राजा पावरा रा़ मालकातर, वाहन मालक दिनेश राणा पावरा रा़ गदडदेव ता़ शिरपूर आणि मद्यसाठ्याचे मालक गुरमितसिंग वधवा, दिलिपसिंग वधवा यांच्याविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई व ६६ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल रफीक पठाण, गौतम सपकाळे, नितीन मोहने, राहुल सानप यांनी ही कारवाई केली़
सदरचा मद्यसाठा आणि चार लाख रुपये किमतीचे पीकअप वाहन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे़