मनपाच्या बाराशे कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी झाला पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:24 IST2020-11-13T22:24:04+5:302020-11-13T22:24:53+5:30

धुळे : कोरोना काळात अहोरात्र नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी आंनदात जावू, यासाठी मनपाच्या १२०० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ...

Twelve hundred employees of the corporation were paid before Diwali | मनपाच्या बाराशे कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी झाला पगार

dhule

धुळे : कोरोना काळात अहोरात्र नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी आंनदात जावू, यासाठी मनपाच्या १२०० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सात कोटींचे वेतन वाटप करण्यात आले आहे.
मनपात सुमारे १२०० ते १३०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. शासनाकडून महिन्याच्या ७ ते ८ तारखेपर्यत वेतन देण्यात येते. कोरोना काळात महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांचे योगदानाची दखल घेत प्रशासनाकडून कायम व तात्पूर्ती सेवा बजावणारे असे एकूण १२०० ते १३०० कर्मचाऱ्यांना ७ लक्ष रूपये वेतनाचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच ८४ लाख ६०० रूपये ॲडव्हास वेतनाचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोनानंतर उत्पन्नावर काय फरक पडला?
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार महिन्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता करात सवतल देण्यात आली होती. लॉकडाऊननंतर ही नागिरकांनी कराचा भरणार करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने बरऱ्यापैकी वसुली झाली. त्यामुळे कोरोनामुळे काहीसा परिणाम यंदा झालेला आहे.
दिवाळी आनंददायी ?
दिवाळी सनाच्या पूर्वसध्येला बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे लाॉकडाऊन काळात जरी व्यवहार ठप्प असले तरी सध्यातरी आथिक टंचाई दिसून येत नाही.

Web Title: Twelve hundred employees of the corporation were paid before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे