रेशन दुकानातून तूरदाळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:43+5:302021-02-05T08:45:43+5:30
शहरी भागात तूरडाळीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. मागील दोन वर्षांपासून राज्यात तूरडाळीचे बंपर उत्पादन होत आहे. ...

रेशन दुकानातून तूरदाळ गायब
शहरी भागात तूरडाळीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. मागील दोन वर्षांपासून राज्यात तूरडाळीचे बंपर उत्पादन होत आहे. यामुळे रेशन दुकानातून नागरिकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात ------ रेशनकार्डधारक आहेत. रेशन दुकानात तूरदाळ ५५ ते ६० रुपये किलो दराने दिली जात होती. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या तूरदाळच्या तुलनेत रेशन दुकानातील किलोचा दर कमी असल्याने नागरिकांना तूरदाळ परवडणारी होती. मात्र मध्यंतरी पुरवठादारांकडून प्राप्त होणारी तूरदाळचा दर्जा खालावल्याने रेशनधारकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या होत्या. तसेच तांदूळ व गहूचा पुरवठा झाल्यानंतर तूरदाळचा पुरवठा होत असल्याने पुरवठा विभाग, रेशन दुकानदार तसेच रेशनधारकांची गैरसाेय होत होती. त्यामुळे सध्यातरी तूरदाळ पुरवठा बंद असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
डाळ नसल्याच्या तक्रारी
रेशन दुकानातून नागरिकांना यापूर्वी तूरदाळ दिली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र मध्यंतरी शासनाने तूरदाळ पुरवठा बंद केल्याने केवळ गहू व तांदूळ दिला जात आहे. तूरदाळ देण्यात यावी, याबाबत अनेकवेळा सामाजिक संघटनांकडून मागणी झालेली आहे. मात्र नागरिकांच्या मागण्या व तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजही नागरिकांना न्याय मिळू शकलेला नाही. गहू, तांदूळ तसेच तूरदाळ द्यावी, अशी मागणी होत आहे.
गहू व तांदूळ सर्वाधिक पुरवठा
जिल्ह्यात यापूर्वी रेशनधारकांना गहू, तांदूळ, साखर, तेल, तूरदाळ, राॅकेल आदींचा पुरवठा केला जात होता. त्यानंतर हळूहळू शासनाकडून स्वस्त रेशन दुकानांना इतर वस्तूंचा पुरवठा कमी होत असल्याने रेशन दुकानातून साखर, तेल, तूरदाळ तसेच राॅकेल गायब झाले आहेत. त्यामुळे सध्या तांदुळ व गहू अशा दोन दोन वस्तू दिल्या जात आहे. यासोबतच साखर, तेल व तूरदाळ अशा तीन वस्तू रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.