मंगळवारी जिल्ह्यातील १५ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:12 IST2020-06-09T20:50:13+5:302020-06-09T21:12:25+5:30
. साक्री येथील सात रूग्णांना कोरोनाचा संसर्ग

dhule
धुळे- मंगळवारी जिल्ह्यातील आणखी १५ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील भोई गल्ली जुने धुळे येथील एक, मोहम्मदीया नगर व दक्षता नगर येथील एका रूग्णाचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच शिरपूर येथील पाच रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री येथील सात रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. साक्री येथील कासार गल्ली येथील चार व पोळा चौक येथील तिघांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.